इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. त्याच्या किमतीत ३०.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहे. तीन महिन्यानंतर गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर २५.५० रुपयांनी, फेब्रुवारी महिन्यात १४ रुपयांची वाढ झाली होती. जानेवारी महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत दीड रुपयांनी वाढ झाली होती. आता तीन महिन्यानंतर व्यावसायिक गॅस स्वस्त झाला आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तीस रुपयांहून अधिक कपात करण्यात आल्यामुळे व्यवसाय करणा-यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरला दरवाढीचा फटका बसत असताना निवडणुकीच्या काळात हा गॅस स्वस्त झाला आहे. दरम्यान, घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीत गेल्याच महिन्यात कपात करण्यात आली होती.