इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीचे नेते निवडणुकीपूर्वी एका मंचावर आज दिसत आहेत. आज दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचा संयुक्त विराट सभा होत आहे. या सभेसाठी देशभरातील इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले आहे.
आम आदमी पक्षाला निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांकडून रॅलीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. रॅलीमध्ये जास्तीत जास्त २० हजार लोकांनाच जमण्याची अट घालण्यात आली आहे. ‘हुकूमशाही हटाव, लोकशाही वाचवा’ अशी घोषणा रॅलीचे घोषवाक्य आहे. त्यात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांचे डझनभर मोठे नेते सहभागी झाले आहेत. या रॅलीत शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव हेही सहभागी झाले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या वतीने डेरेक ओब्रायन रॅलीत सहभागी झाले आहेत.
केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासोबतच विरोधक ऐतिहासिक रामलीला मैदानातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहेत.