बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जायफळाचे बी जाणार नाही वाया… शेतकऱ्यांना मोठा फायदा…

by India Darpan
मार्च 31, 2024 | 11:59 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240331 WA0173 1 e1711866543737

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सर्वसाधारणपणे जायफळाचे बी वाया जाते. मात्र, आता ते वाया जाणार नाही. गोव्यातील शास्त्रज्ञांच्या संशोधनाला यश आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जायफळाच्या बी पासूनही उत्पन्न मिळू शकणार आहे.

गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्र (ICAR-CCARI) मधील डॉ. ए.आर. देसाई आणि त्यांच्या नेतृत्वाखालील चमूच्या “जायफळ टॅफी तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले उत्पादन” नावाच्या शोधाला पेटंट क्रमांक 528119 (अर्ज क्रमांक 201621012414, दिनांक 8 एप्रिल 2016) प्रदान करण्यात आला आहे.

जायफळ, भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक असून त्याची प्रामुख्याने जायफळ बी आणि गर यासाठी लागवड केली जाते. कापणीनंतर बहुतेक वेळा जायफळाचे बीज कोष शिल्लक राहतात. या शिल्लक उप-उत्पादनाची दखल घेत गोव्यातील आयसीएआर – सीसीएआरआय ने जायफळ बीज कोषांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशानेएक उपाय विकसित केला आहे – जायफळ बीज कोष टॅफी. या नाविन्यपूर्ण उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण पौष्टिक मूल्य असून ते ताज्या फळाच्या 80-85% भाग बनते आणि कृत्रिम संरक्षकांशिवाय सामान्य तापमानात 12 महिन्यांपर्यंत सोयीस्करपणे साठवले जाऊ शकते. यामुळे हे उत्पादन एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय बनले आहे.

या नव्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे, शेतकऱ्यांना पारंपरिक जायफळ मसाल्याच्या उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त प्रत्येक झाडामागे 5,600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. हे उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेची साधेपणा, त्यासाठी अगदी थोड्या उपकरणांची आवश्यकता आणि व्यावसायिक व्यवहार्यता या वैशिष्ट्यांमुळे कृषी-उद्योजकता, स्वयं-सहायता गट, लघु आणि मध्यम-स्तरीय अन्न उद्योग आणि कृषी-पर्यावरण पर्यटन केंद्रांसह विविध क्षेत्रांमध्ये त्याची व्यापक अंमलबजावणी होऊ शकेल.

या आविष्काराच्या तंत्रज्ञान हस्तांतरातून गोव्यातील नेत्रावली येथील मेसर्स तनशीकर स्पाइस फार्म आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा या संस्थांनी आधीच यशस्वी व्यापारी उत्पादन सुरू केले आहे. हे नव उत्पादन म्हणजे सामाजिक – आर्थिक विकासाच्या दृष्टीने कृषी नवोन्मेषांच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

गोव्यातील आयसीएआर – सीसीएआरआय च्या इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट युनिटने पेटंट अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तसेच कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संस्थेची बांधिलकी दर्शवली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘चैत्र चाहूल’चे २०२४ चे ध्यास सन्मान जाहिर!…या रंगकर्मींचा होणार गौरव

Next Post

LIve: दिल्लीत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी रामलिला मैदानावर विरोधी पक्षांची महारॅली (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Untitled 113

LIve: दिल्लीत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी रामलिला मैदानावर विरोधी पक्षांची महारॅली (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011