शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डी लोकसभा मतदारसंघात राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यामुळे ही चर्चा सुरु झाली आहे.
रुपवते या काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही होत्या. पण, या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने त्याचा हिरमोड झाला. त्यामुळे त्या वंचितकडून उमेदवारी करणार असल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात त्यांनी उमेदवारी केल्यास ठाकरे गटाची चिंता वाढणार आहे.
रुपवते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांनी बंडखोरी करत इतर पर्याय निवडला, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. रुपवते गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढला आहे.