इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभाबरोबरच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत मतदानापूर्वीच मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह भाजपच्या पाच उमेदवार बिनविरोध झाले आहे. या उमेदवारांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज भरला नसल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिलला विधानसभेच्या साठ जागांसाठी मतदान होत आहे. त्यात अगोदरच भाजपच्या पारड्यात पाच जागा पडल्या आहे. शनिवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर विजयाची घोषणा होईल.
सत्ताधारी भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ४१ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली होती. याशिवाय संयुक्त जनता दलाने सातजागा, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) ने पाच आणि काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या. दोन जागांवर अपक्ष विजयी झाले होते. आताही भाजपच अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता मिळवेल हे स्पष्ट झाले आहे.
हे होतील बिनविरोध आमदार
मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह तालिमधून जिक्के ताको, तालिहामधून न्यातो दुकोम, सागलीमधून रातू टेची आणि रोईंग विधानसभा मतदारसंघातून मुचू मिठी यांची निवड बिनविरोध होईल.