नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसां पासून उन्हाचा पारा ३८ ते ३९ अंशावर पोहचल्याने तापमानात वाढ झाली. मात्र आज सकाळपासून जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण तर सिन्नर, लासलगाव, चांदवड व मालेगाव शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या अवकाळी पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण होऊन तापमानात घट झाली असली तरी ढगाळ वातावरणामुळे उष्मा वाढला आहे. दुसरीकडे अवकाळी झालेल्या पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावला आहे. मालेगावमध्ये काल ४१.२ अंशावर तापमान होते. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. पण, आज पावसाने हजेरी लावल्यामुळे काहीसा दिलासा मालेगावकरांना मिळाला.