इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातप्रकरणी आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांवर वैजापूर पोलिस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता या अधिका-यांनी गाडी थांबवल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात या अधिका-यांची चुक असल्याचे समोर येत आहे. हे दोन्ही अधिकारी असिस्टंट इ्न्स्पेक्टर आहे. त्यांचे निलंबनही करण्यात आले आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असे या अधिका-यांचे नाव आहे.
रात्री समृद्धी महामार्गावरील अपघातातील जखमींनी दिलेली माहीत अशी की, या ट्रकचा हे आरटीओ पाठलाग करत होते. टोलनाक्यापासून काही अंतर पुढे गेल्यावर आरटीओच्या या अधिका-यांना ट्रकला थांबवले. त्यानंतर ट्रक थांबला, पण, त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हरलरची ट्रकला जोरदार धडकली व अपघात झाला. आता ही ट्रक अचानक थांबवल्यामुळे हा अपघात झाला का… असे ट्रक थांबवता येतात का असे अनेक प्रश्न आहे. ते सर्व चौकशीतून आता बाहेर येईल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरटीओच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे तर पालकमंत्री संदीपान भुनरे यांनी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते असे सांगितले आहे.
१२ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी
या अपघातात समृद्धी महामार्गावर नाशिकची ट्रव्हल्स बस ट्रकच्या मागे होती. रात्री जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने या ट्रकला थांबवले. त्यामुळे ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. अचानक ब्रेक मारल्यामुळे ही ट्रव्हल्स बस ट्रकला धडकली. त्यात नाशिकच्या १२ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले.
आरटीओ अधिकारी अगोदर पळून गेले
या अपघातानंतर कमलेश मस्के यांनी पोलिस स्थानकात तक्रार केली. त्यानंतर आरटीओ अधिकारी प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ट्रक ड्रायव्हर ब्रिजेशकुमार याच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे हा अपघात झाल्यानंतर आरटीओ अधिकारी अगोदर पळून गेले. त्यानंतर त्यांनी अपघात झाल्याचा फोनही केल्याचे पोलिसांनी सांगितले.
रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान झाला अपघात
समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्स बस व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ जण ठार तर २३ जण जखमी झाले आहे. ही ट्रव्हल्स बस नाशिकची असून बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून ती पुन्हा नाशिककडे परत येत होती. त्यावेळेस हा अपघात झाला. या ट्रव्हल्स बसने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला.
रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या
याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक येथे राहणारे ३५ भाविक खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. वापस येतांना समृद्धी महामार्गावर (वैजापूर) अगरसायगाव परिसरात रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान ट्रकला पाठीमागून धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. या अपघातातील सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य
हा झालेला अपघात इतका भीषण होता की, यामध्ये १२ जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला. त्यात एका ६ वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश होता. तर यात अन्य २३ जण जखमी झाले. काही गंभीर जखमी अवस्थेत आहे. या जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य केले.