नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – गंगापूर रोडवरील बारदान फाटयाजवळ झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात मृत पावलेल्यामध्ये एक तरुण व एका तरुणीचा समावेश आहे. कु. रिध्दी प्रशांत गुजराथी (१८) रा. खोडेनगर, पंचवटी व रवींद्र धारणकर (१८) काठे गल्ली, व्दारका हे जागीच ठार झाले. तर आयर्न फडकर (१८) व मृण्मयी अहिरे (१८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
गंगापूर धरणाजवळील बोट क्लबमध्ये हे सर्व जण गेले होते. परत येत असतांना त्यांच्या कारचा अपघात झाला. गाडीचे टायर फुटल्याने ही घटना घडली. ही कार तीन वेळा पटली झाली व नंतर झाडावर आदळली. गाडीमध्ये पुढे बसलेले आयर्न व मृण्मयी बचावले पण, मागे बसलेले दोघेही ठार झाले.
बारदान फाट्याजवळ झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदत केली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.