बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकसभा पूर्वपीठिका-२०२४ चे प्रकाशन…ही आहे ठळक वैशिष्ट्ये

by India Darpan
मार्च 27, 2024 | 12:55 am
in राज्य
0
DSC 0817

अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली विदर्भातील (नागपूर-अमरावती विभाग) सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विभागीय आयुक्तांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात पूर्वपीठिकेचे प्रकाशन झाले. नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी, सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार, अमरावतीचे विभागीय माहिती उपसंचालक अनिल आलुरकर, विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हा माहिती अधिकारी सर्वश्री हर्षवर्धन पवार, मंगेश वरकड, गजानन कोटुरवार, यासेरोद्दिन काझी, श्रीमती अर्पणा यावलकर, सहायक संचालक विजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तात्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही संदर्भ पुस्तिका अल्पावधीत व परिपूर्ण माहितीसह सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल डॉ. पाण्डेय यांनी माहिती विभागाचे कौतुक केले.

श्री. रामदासी यांनी पूर्वपिठिकेचे महत्त्व विषद करीत माध्यम प्रतिनिधी व लोकसभा निवडणुकीतील विविध अधिकाऱ्यांना ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असे सांगितले. ही पुस्तिका नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूर्वपीठिकेची ठळक वैशिष्ट्ये :
पूर्वपीठिका 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम, विधानसभा मतदार संघनिहाय मतदार व मतदान केंद्राबाबत माहिती, विदर्भात (नागपूर-अमरावती विभाग अंतर्भूत) झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वर्ष 2004 ते 2019चे निकाल तसेच मतदारांची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, इतर अधिकारी, तसेच विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ,माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती आदींसह निवडणूक आचारसंहिता, मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचार संहिता, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची माहिती, पेड न्यूज, सोशल मीडिया, निवडणूक विषयक नियमांतील ठळक बाबी आदींचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपने वरुण गांधींना उमेदवारी नाकारल्यानंतर काँग्रेसने दिली ही ऑफर

Next Post

रिझर्व्ह बँकेने नाशिकच्या या बँकेला केला ५९ लाख ९० हजाराचा आर्थिक दंड….

India Darpan

Next Post
rbi 11

रिझर्व्ह बँकेने नाशिकच्या या बँकेला केला ५९ लाख ९० हजाराचा आर्थिक दंड….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011