नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने धुलीवंदनाच्या निमित्ताने पश्चिम बंगाल येथील सुप्रसिध्द बासरीवादक सुदीप चटोपाध्याय यांच्या सुमधुर बासरी वादनाने नाशिककर मंत्र मुग्ध झाल्याचे पहावयास मिळाले.सायंकाळी ६.३० वाजता गोदाआरती नंतर रात्री ७.३० वाजता या सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्यास नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी होते.
यावेळी जयंत गायधनी अध्यक्ष,मुकुंद खोचे सचिव, प्रफुल्ल संचेती,शिवाजी बोन्दारडे,शैलेश देवी, चिराग पाटील,चैतन्य गायधनी,आशिमा केला,कविता देवी आदी सदस्य उपस्थित होते.श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने नित्यनियमाने गोदा आरती करण्यात येत आहे. या आरती सोहळ्यास नाशिककर बांधवासह देश विदेशातील पर्यटक उपस्थिती लावत आहे. त्यानिमित्ताने समितीच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आज पश्चिम बंगाल येथील सुप्रसिध्द बासरी वादक सुदीप चटोपाध्याय यांच्या सुमधुर बासरी वादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रसिद्ध बासरी वादक सुदीप चटोपाध्याय हे पन्नालाल घोष घराण्याचे बासरी वादक असून पश्चिम बंगाल मधील ते सर्वात ज्येष्ठ असे बासरी वादक आहे. त्यांनी संगीत इन्स्ट्रूमेंटल क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. ते शिक्षक म्हणून देखील कार्यरत आहे. या सोहळ्यास नाशिककर बांधवांनी मोठ्या उपस्थित होते.