पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यात उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमान ३९ अंशावर गेले आहे. होळीनंतर तापमानात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये पारा आताच ४०.८ अंशावर पोचला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कोरडे हवामान आहे. दक्षिण भारताकडून राज्यात उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. २७ तारखेपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात काहिली आणखी वाढणार आहे.
तापमानात १९७० पासून सातत्याने वाढ होत असल्याची नोंद आहे. १९७० ते २०२४ या काळात मार्च महिन्यात एकदाही तापमानात घसरण झालेली नाही. राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मालेगावला झाली. ४०.०८ अंश सेल्सिअस तापमान मालेगाव येथे होते. नाशिक शहराचे कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस गेले.