इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली राऊस एव्हेन्यु कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मद्य धोरण प्रकरणी चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. आता आम आदमी पार्टीने या कारवाई विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाचा कार्यक्रमच आपने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर जाहीर केला आहे. त्यात २३ मार्च रोजी भगतसिंह, सुखदेव व राजगुरु केले बलिदान दिवस पर शहीद पार्क येथे इंडिया आघाडी व आपचे नेते विरोध प्रदर्शन करणार आहे.
त्यानंतर २४ मार्च रोजी दिल्लीत ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी यांचा पुतळयाचे दहन करणार आहे. त्यानंतर २५ मार्च रोजी जनते बरोबर जनसंवाद आप करणार आहे.
या कार्यक्रमांबरोबर आपने सोशल मीडियात या पोस्टही केल्या आहे. केजरीवाल एक कट्टर देशभक्त हैं आपसे और आपकी टुटपुँजियों से नहीं डरने वाले हैं।जन क्रांति की लौ” कायर तानाशाह का तख़्त गिरा देगी। ज़्यादा से ज़्यादा संख्या में क्रांति का हिस्सा बन इतिहास में अपना नाम दर्ज करवायें। #देशकेज़रीवालकेसाथहै