इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत मनसे नेते राज ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर महायुतीबाबत झालेल्या बैठकीत दोन जागाबाबत संमती झाली असून आता या दोन जागा कोणत्या यावर राज्यभर चर्चा सुरु झाल्या आहे. त्यात दक्षिण मुंबईची जागा निश्चित आहे. पण, दुसरी जागा शिर्डी व नाशिकची यावर चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेमुळे शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांचे धाबे दणाणले आहे. शिर्डीमध्ये खा. सदाशिव लोखंडे व नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे दोन्ही शिंदे गटाचे खासदार आहे. या दोघांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. पण, आता मनसेच्या इंन्ट्रीमुळे त्यांची झोप उडाली आहे.
या सर्व घडामोडीवर अजून कोणीही अधिकृत भाष्य केलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मनसे असणार असल्याचे बोलले जात होते. आता त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार्टड विमानाने सोमवारी दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांची भेट भाजप नेते विनोद तावडे यांनी हॅाटेलमध्ये पहिले घेतली. त्यानंतर हे दोघेही गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले. येथे अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीत राज ठाकरे यांनी तीन जागेचा आग्रह धरणा असून त्यांना दोन जागा देण्याचे निश्चित झाले आहे. या दोन जागेवर मनसे स्वतच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या चिन्हावर लढवण्याची अट राज ठाकरे यांनी अमान्य केली असून त्यामुळे हा विषय़ आता संपला आहे. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर हे जवळपास मनसेचे उमेदवार निश्चित आहे. आता दुसरी जागा कोणती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक किंवा शिर्डी या पैकी एक जागा मनसेला मिळू शकते.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांना दावा केलेल्या या सर्व जागा शिंदे गटाकडे असल्यामुळे या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आज चर्चा होवू शकते. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलेल जात आहे.