नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी १० हजाराची लाच घेतांना चांदवड तालुक्यातील तलाठी विजय राजेंद्र जाधव हे लाच लुपपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तक्रारदाराकडे १५ हजाराची मागणी करण्यात आली पण, तडजोडी अंतर १० हजाराची लाच स्विकारली.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आई ,मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता .चांदवड येथील शेती वाटपा साठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता. कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव ता चांदवड येथील गट नंबर 410,412,414 या गटातील 50-50 गुंठे जमीनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता. तो अर्ज पुढील कार्यवाही साठी मंडल अधिकारी यांचे मार्फत यातील आलोसे यांच्याकडे देण्यात आला होता.या कामासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष
आलोसे– विजय राजेंद्र जाधव वय 33 वर्ष पद – तलाठी सज्जा शिंगवे अतिरिक्त कार्यभार कुंदलगाव ता .चांदवड जि .नाशिक रा . श्रम साफल्य कॉलनी ,प्लॉट नंबर 11,वडेल रोड ,वलवाडी ,देवपूर ,धुळे
*लाचेची मागणी रक्कम – रुपये 15000 दिनांक 18/3/2024
*लाच स्वीकारली रक्कम – रुपये 10,000/- दिनांक- 18/3/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांच्या आई ,मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता .चांदवड येथील शेती वाटपा साठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव ता चांदवड येथील गट नंबर 410,412,414 या गटातील 50-50 गुंठे जमीनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्या ला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता तो अर्ज पुढील कार्यवाही साठी मंडल अधिकारी यांचे मार्फत यातील आलोसे यांच्या कडे देण्यात आला होता .या कामासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदारा कडे पंचांसमक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .
*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – मा .जिल्हाधिकारी नाशिक
*सापळा अधिकारी – विश्वजीत पांडुरंग जाधव पोलीस उप अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक*
सापळा पथक–
पो. ह .प्रणय इंगळे
पो कॉ अनिल गांगुर्डे
चालक पो ह विनोद पवार
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक*