नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यशवंत पंचायत राज अभियान विभागीय पुरस्कारांचे वितरण हे मा.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंत पंचायत राज अभियान सन २०२०-२१ अंतर्गत द्वितीय पुरस्कार नाशिक पंचायत समिती व तृतीय पुरस्कार कळवण पंचायत समितीला मा.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सन २०१९-२० व सन २०२०-२१ च्या गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये नाशिक जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहायक अंबादास पाटील (सन २०१९-२०) व वरिष्ठ सहायक प्रदीप आहिरे यांना मा.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.