बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगांव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन महिने वेतन नाही…१३ मार्च पासून काम बंद आंदोलन

by India Darpan
मार्च 11, 2024 | 8:48 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 26

लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगांव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या गेली तीन महिने वेतन नसल्याने आणि लासलगाव सरपंच पदाची स्वाक्षरी बाबत प्रशासन कोणतेच निर्णय घेत नसल्याने १३ मार्च पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल आणि निफाड पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी आमरण उपोषण करतील असा निर्वाणीचा इशारा असलेले निवेदन निफाडचे गटविकास अधिकारी यांना दिल्याने आता लासलगावकरांसमोर. एेन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. साफसफाई बंद राहिल्यास नवे संकट उभे राहणार आहे.

यापूर्वी १ मार्च रोजी लासलगाव ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निवेदन देऊनही प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी काहीच निर्णय घेत नाहीत. त्यामुळे हे अखेरचे पाऊल कर्मचा-यांनी उचलले आहे. आज दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत लासलगांव येथील कर्मचाऱ्यांचे मागील ३ महिन्यांपासुन वेतन मिळालेले नसल्याने उपोषण करण्यासंदर्भात लेखी निवेदनाद्वारे कळविलेले होते. परंतु लासलगांव येथील सरपंच पदाच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन मिळताच कळविण्यात येईल असे कळविले आहे. परंतु अद्यापपावेतो कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा योग्य मार्गदर्शन मिळालेले नसल्याने १२ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती निफाड येथील अधिकारी वर्गाचा वेळ काढुपणाच्या आणि संदिग्ध पत्रव्यहार करण्याच्या विरोधात लासलगांव येथे प्रथम निषेध करण्यात येणार आहे.

तसेच १३ मार्च २०२४ पासुन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणारे सर्व प्रकारचे काम बंद (पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती विभाग, सामान्य प्रशासन) ठेवुन काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायत लासलगांव येथील कर्मचाऱ्यांना मागील ३ महिन्यापासुन वेतन नसल्याने कर्मचारी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. तसेच बँक हप्ते, एलआयसी हप्ते आणि महत्वाच्या बाबी प्रलंबीत राहीलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन हे अत्यल्प असुन तेही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे.

कर्मचाऱ्यांना वैद्यकिय सेवा घेणे देखील जिकरीचे झालेले आहे. तसेच त्यांचे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. निफाडचे गट विकास अधिकारी यांनी दिनांक १३ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात उचित कारवाई न झाल्यास किंवा योग्य मार्गदर्शन प्राप्त न झाल्यास सदरचे दिवशी ११ वाजेनंतर पंचायत समिती निफाड येथे ग्रामपंचायत लासलगांव येथील सर्व महिला पुरुष कर्मचाऱ्यांसह आपले दालनामध्ये उपोषणास बसणार असल्याचा इशारा देऊन य जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नाही तो पर्यंत ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे असे म्हंटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बनावट जीएसटी नोंदणी करुन ३१.०६ कोटी रुपयांची फसवणूक…पालघरमध्ये एकाला अटक

Next Post

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात झालेले हे २३ महत्त्वपूर्ण निर्णय वाचा सविस्तर…..

India Darpan

Next Post
Mantralay

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात झालेले हे २३ महत्त्वपूर्ण निर्णय वाचा सविस्तर…..

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011