नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील सर्वात विश्वसनीय स्मार्टफोन सेवा प्रदाता असलेल्या रियलमीने आज रियलमी १२ सिरीज ५जी लाँच करण्याची घोषणा केली. रियलमी १२ सिरीज ५जी अंतर्गत रियलमी १२ प्लस ५जी आणि रियलमी १२ ५जी हे दोन स्टँडआउट स्मार्टफोन सादर केले आहेत, जे रियलमीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड म्हणून ओळखले जातील. हे लाँचिंग त्याच्या ‘मेक इट रिअल’ या सुधारित धोरणाशी सुसंगत आहे आणि तरुण वापरकर्त्यांशी एकरुप होणाऱ्या ब्रॅंडची ओळख प्रदर्शित करते.
प्लसचा अनुभव आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सचा दर्जा उंचावणारा रियलमी १२ प्लस ५जी हा एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये सेग्मेंटमधील पहिला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनयुक्त (ओआयएस) ५० एमपी सोनी एलवायटी-६०० मुख्य कॅमेरा, २एक्स इन-सेन्सर झूम आणि डीएसएलआर सारखे स्पष्ट पोट्रेट कॅप्चर करण्यासाठी सिनेमॅटिक २एक्स पोर्ट्रेट मोड उपलब्ध आहे.यात ११२° अल्ट्रा-वाइड कॅमेरा, १६एमपी एचडी सेल्फी कॅमेरा देखील उपस्थित आहे. यासोबतच, यात १२०एचझेड अल्ट्रा-स्मूथ एमोलेड डिस्प्ले, ६७डब्ल्यू सुपर वीओओसी चार्जिंग आणि वापरासाठी दीर्घकाळ टिकणारी ५०००एमएएच ची भक्कम बॅटरी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यात २५६ जीबी पर्यंत स्टोरेज, डायनॅमिक रॅम आणि आयपी ५४ डस्ट व वॉटर रेझिस्टन्स यांसारखी उल्लेखनीय वैशिष्ट्ये देखील आहेत.अँड्रॉइड १४ वर आधारित युजर-फ्रेंडली रियलमी युआय ५.० वर चालणारा रियलमी १२ प्लस ५जी पायोनियर ग्रीन आणि नेव्हिगेटर बेज या दोन रंगांमध्ये आणि ८ जीबी +१२८ जीबी ची किंमत रुपये २०,९९९ व व ८ जीबी +२५६ जीबी ची किंमत रुपये २१,९९९ अशा दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
८ जीबी +२५६ जीबी व्हेरियंटच्या खरेदीवर युजर्स रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर ९ महिन्यांपर्यंतच्या नो कॉस्ट ईएमआयसह रु.१००० चे बँक ऑफर मिळवू शकतात.मेनलाइन चॅनेलवरून स्मार्टफोन खरेदी केल्यास ग्राहकांना रु.३९९८ किमतीचे रियलमी बड्स टी३०० मिळतील. दुसरीकडे, ८ जीबी +१२८ जीबीच्या खरेदीवर ग्राहकांना रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर रु. २००० च्या किंमतीच्या बँक ऑफरसह रु. १००० पर्यंत सूटही मिळू शकते. याव्यतिरिक्त, वापरकर्ते रियलमी डॉट कॉम वर ९ महिन्यांपर्यंत आणि फ्लिपकार्ट वर ६ महिन्यांपर्यंतचे नो कॉस्ट ईएमआय मिळवू शकतात.
रियलमी १२ ५जी हा एक वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये उच्च-गुणवत्तेच्या इमेजेस कॅप्चर करण्यासाठी १०८ एमपी ३एक्स झूम पोर्ट्रेट कॅमेरा उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन स्मूथ परफॉर्मन्ससाठी मिडिया टेक डायमेंसिटी ६१०० प्लस ५जी चिपसेट आणि हाय कलर डिस्प्लेयुक्त ६.७२-इंच एफएचडी प्लस सनलाइट डिस्प्लेसह सुसज्ज आहे, ज्यामुळे प्रभावी आणि स्पष्ट व्हिज्युअल्स सुनिश्चित होतात. या स्मार्टफोनमध्ये ४५डब्ल्यू सुपरवूच चार्ज आणि दीर्घकाळ वापरासाठी ५००० एमएएच ची भक्कम बॅटरी देखील आहे. या स्मार्टफोनच्या इतर उल्लेखनीय वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर, फ्लेक्सीबल परफॉर्मन्ससाठी वाढवता येणारी मेमरी, ८ एमपी सेल्फी कॅमेरा, बायोमेट्रिक ओळखसाठी डायनॅमिक बटण आणि राइडिंग मोड* इत्यादींचा समावेश आहे. यात मिनी कॅप्सूल २.० देखील उपलब्ध आहे, जे पाणी आणि सूक्ष्म कणांपासून संरक्षण प्रदान करते. अँड्रॉइड १४ वर आधारित असलेल्या रियलमी यूएल ५.० वर चालणारा रियलमी १२ ५जी हा ट्वीलाईट पर्पल आणि वुडलँड ग्रीन अशा दोन रंगांमध्ये आणि रु.१६,९९९ किमतीच्या ६जीबी + १२८ जीबी व रु.१७,९९९ किमतीच्या ८ जीबी +१२८ जीबी अशा दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.