…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड तालूक्यातील सोग्रस येथील दुभाजकात मजार उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्या नंतर त्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले होते. आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा उचलल्या नंतर अखेर काल प्रशासनाची बैठक झाली. त्यानंतर मध्यरात्री ही मजार दुभाजका मधून पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. ती अन्यत्र विधीवत बसविण्यात आली असून तेथे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.