मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अर्थखात्या अंतर्गत असलेल्या वित्त अन्वेषण विभागानं पेटीएम पेमेंटस् बँकेला ५ कोटी ४९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे पेटीएम पेमेंटस् बँकेच्या अडचणींत वाढ झाली आहे.
अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकानुसार, वित्त अन्वेषण विभागानं बेकायदा कृत्यांमध्ये गुंतलेल्या काही संस्था आणि त्यांच्या व्यावसायिक संबंधाच्या संदर्भात, सक्तवसुली संचालनालयाकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे पेटीएम पेमेंटस् बँकेच्या व्यवहारांचा तपास सुरू केला.
त्यामध्ये ऑनलाईन जुगाराचं आयोजन आणि सुविधा प्रदान करण्यासारख्या बेकायदा आयोजनातून मिळालेले पैसे बँक खात्यांद्वारे पेटीएम पेमेंटस् बँकेच्या खात्यात पाठवण्यात आल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.