बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड येथे संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न (बघा व्हिडिओ)

by India Darpan
मार्च 1, 2024 | 12:06 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20240301 115737 WhatsApp

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनमाड : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न मनमाड येथे रात्री साडेअकरा वाजता झाला. भिडे हे येवल्याहून मालेगावच्या दिशेने जात असताना आंबेडकर अनुयायांनी त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक झालेल्या काहींनी थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

भिडे हे मालेगावला जात असताना मनमाड येथे त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भिडे मुर्दाबादच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. अश्लील शब्दातही घोषणाबाजी करण्यात आली. काळे झेंडे दाखून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या वेळी काही तरुण आणि तरुणी भिडे यांच्या गाडीला आडवे झाले. त्यांची गाडी अडवून जोरजोराने बडवण्यात आली. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना बाजूला केले.

काळे झेंडे दाखवणाऱ्या आणि गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संभाजी भिडे यांना बंदोबस्तात धुळ्याकडे रवाना केले. भिडे हे येवल्याहून मालेगावच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळताच आंबेडकर अनुयायांनी जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांचा ताफा अडवला. गाडीत पुढील सीटवर भिडे बसलेले होते. या वेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी काचावर आणि गाडीच्या पुढील भागावर जोरजोरात हाताने मारले. एकाने पायातील बूट काढून गाडीवर मारला. पोलिसांनी रस्ता मोकळा करून दिल्यावर भिडे मालेगावच्या दिशेने रवाना झाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या या १०१ पुरातन वस्तूंचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरण

Next Post

अजित पवार गटाच्या १३७ जणांचे राजीनामे…हे आहे कारण

India Darpan

Next Post
ajit pawar11

अजित पवार गटाच्या १३७ जणांचे राजीनामे…हे आहे कारण

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011