नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्याकरिता ग्रामसेवक नेताजी शिवाजी भाबड व खासगी इसम प्रा. शामराव माणिकराव बारस्कर हे १५ हजार लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याविरुध्द जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची पत्नीचे नावे मौज वाघा येथे गट नंबर ११४ मध्ये सुमारे दोन हेक्टर क्षेत्र असून सदर क्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीर खोदण्याकरिता प्रस्ताव तक्रारदार यांनी तयार करून ग्रामपंचायत वाघा येथे सादर केला होता. सदर विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्या करिता आलोसे ग्रामसेवक भाबड व खाजगी इसम बारस्कर हे लाच मागणी करत असल्याची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे २२ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार २२ व २३ फेब्रुवारी रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली,पडताळणी दरम्यान ग्रामसेवक भाबड व आरोपी खासगी इसम बरस्कर या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष १५ हजार रुपयाची मागणी करून सदरची लाच रक्कम आलोसे भाबड यांनी खासगी इसम बारस्कर यांच्याकडे देण्यास सांगितली असता आज २८ फेब्रुवारी रोजी सापळा कारवाई दरम्यान खासगी इसम बारस्कर यांनी पंचासमक्ष लाच स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे भाबड व खाजगी इसम बारस्कर यांचे विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट -*अहमदनगर.
*तक्रारदार-* पुरुष,वय-39
आलोसे-1)नेताजी शिवाजी भाबड,वय-50 वर्षे,ग्रामसेवक,वाघा ग्रामपंचायत,जामखेड, ता.जामखेड,जि.अ.नगर,ह.रा.भोरे मिस्त्री यांची रुम,तपनेश्वर रोड,जामखेड, रा.न्याती इबोनि-4, फ्लॅट नं.41, उंडरी गाव,पुणे.
2) शामराव माणिकराव बारस्कर,वय-53 वर्षे,धंदा-नोकरी,प्राध्यापक-जामखेड महाविद्यालय,जामखेड,रा.वाघा,पो.नान्नज,ता.जामखेड,जि.अहमदनगर,ह.मु.कार्ले यांचे फ्लॅट मध्ये भाड्याने,शिवनेरी अँकडमी जवळ,विकास नगर,बीड रोड,जामखेड,जि.अहमदनगर
*लाचेची मागणी- 15,000/-
*लाच स्विकारली- 15,000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 15,000/-रुपये
*लालेची मागणी दि.22/02/2024 व दि.23/02/2024
*लाच स्वीकारली दिनांक
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांची पत्नीचे नावे मौज वाघा येथे गट नंबर 114 मध्ये सुमारे दोन हेक्टर क्षेत्र असून सदर क्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीर खोदण्याकरिता प्रस्ताव तक्रारदार यांनी तयार करून ग्रामपंचायत वाघा येथे सादर केला होता. सदर विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्या करिता आलोसे ग्रामसेवक भाबड व खाजगी इसम बारस्कर हे लाच मागणी करत असल्याची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे दिनांक 22/02/2024 रोजी प्राप्त झाली होती
त्यानुसार दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली,पडताळणी दरम्यान आलोसे क्र.1 भाबड व आरोपी खाजगी इसम बरस्कर या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 15000/₹ मागणी करून सदरची लाच रक्कम आलोसे भाबड यांनी खाजगी इसम बारस्कर यांच्याकडे देण्यास सांगितली असता आज दिनांक 28/022024 रोजी सापळा कारवाई दरम्यान खाजगी इसम बारस्कर यांनी पंचासमक्ष लाच स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे भाबड व खाजगी इसम बारस्कर यांचे विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा व तपास अधिकारी – श्री.राजू आल्हाट,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहमदनगर
*सहाय्यक सापळा अधिकारी – श्री.शरद गोर्डे,पोलिस निरीक्षक,ला..प्र. वि. अहमदनगर
*सापळा पर्यवेक्षणअधिकारी- श्री. प्रवीण लोखंडे, पोलीस उपअधीक्षक, ला प्र. विं, अहमदनगर
*सापळा पथक – मपोना राधा खेमनर, पोलिस अंमलदार बाबासाहेब कराड, गजानन गायकवाड चापोहेकॉ हारून शेख, दशरथ लाड