मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनोज जरांगे यांना केलेल्या आवाहनानुसार मराठा आरक्षात सगे सोयरे यांचा समावेश करुन त्यांनाही आरक्षण द्यावे यासाठी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आज मनमाड येथे सकल मराठा समाजाने मनमाड-येवला महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलन केले.
सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन सुरु असल्याने या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. जोपर्यंत तहसिलदार निवेदन घ्यायला येत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात आल्याने वाहनांमधून प्रवास करणा-या प्रवाशां बरोबर अनेक नागरीक अडकून पडले.
अखेर दीड तासानंतर तहसिलदार आल्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक सुरकळीत करण्यासाठी पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली.