बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईत सोन्याचे दागिने विकणाऱ्या दागिन्यांच्या दुकानावर छापा…हे आहे कारण

by India Darpan
फेब्रुवारी 21, 2024 | 10:49 pm
in संमिश्र वार्ता
0
4AZAW e1708535975330

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलात्मक वस्तू विक्री कायदा २०२० अंतर्गत निर्देशित हॉलमार्किंग आदेशाच्या उल्लंघनाबाबत प्राप्त झालेल्या माहितीवर त्वरित कारवाई करत, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) च्या मुंबई शाखा कार्यालय-II मधील अधिकाऱ्यांच्या पथकाने मीरा रोड येथील एका दागिन्यांच्या दुकानावर छापा टाकला.

भारतीय मानक ब्युरोच्या हॉलमार्कशिवाय सोन्याच्या दागिन्यांचे तसेच सोन्याच्या कलात्मक वस्तूंचे उत्पादन, साठवण आणि विक्री केली जात असल्याचे आणि सोन्याच्या दागिन्यांवर तसेच सोन्याच्या कलात्मक वस्तूंवर जुन्या पद्धतीनुसार चार खुणांचे मार्किंग केले जात असल्याचे मे. मिलन ज्वेलर्स, शांती नगर, मीरा रोड (पूर्व) या दुकानावरील छाप्यादरम्यान आढळून आले. भारतीय मानक ब्युरो कायदा २०१६ च्या कलम 17(1) (a) चे उल्लंघन करत भारतीय मानक ब्युरोचा हॉलमार्क नसून जुन्या पद्धतीनुसार चार खुणांचे मार्किंग असलेले सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलात्मक वस्तूंचा मोठा साठा या छाप्यात जप्त करण्यात आला.

भारतीय मानक ब्युरो कायदा २०१६ च्या कलम 17(1)(a) चे उल्लंघन करणाऱ्यासाठी भारतीय मानक ब्युरो कायदा २०१६ नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास अथवा किमान २ लाख रुपये दंड अथवा दोन्ही या शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्याच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय II चे प्रमुख तसेच ‘एफ’ श्रेणीतील शास्त्रज्ञ संजय विज यांनी दिली.

भारतीय मानक ब्युरो सर्व ग्राहकांना, भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणन अनिवार्य असलेल्या उत्पादनांची यादी शोधण्यासाठी BIS CARE ॲप (मोबाइल Android आणि iOS दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्यास नेहमीच प्रोत्साहित करतो. याशिवाय सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील ISI मार्कचा खरेपणा तपासण्यासाठी http://www.bis.gov.in या भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन ग्राहकांना केले जाते.

भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणन अनिवार्य असलेली उत्पादने हॉलमार्क शिवाय विकली जात असल्याचे किंवा कोणत्याही उत्पादनावर ISI मार्कचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी MUBO-II, पश्चिम विभागीय कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, ५ वा मजला, CETTM कॉम्प्लेक्स, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई – 400076 या कार्यालयाच्या प्रमुखांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन भारतीय मानक ब्युरोने केले आहे. अशा तक्रारी hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील नोंदवल्या जाऊ शकतात. या माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसानबाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता

Next Post

पंतप्रधान या तारखेला गुजरात आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर…इतक्या कोटीच्या विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण व पायाभरणी

India Darpan

Next Post
modi 111

पंतप्रधान या तारखेला गुजरात आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर…इतक्या कोटीच्या विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण व पायाभरणी

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011