नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) अनुक्रमे 05.02.2024 आणि 09.02.2024 रोजी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली न्यास (दुसरी सुधारणा) नियम 2023 आणि निवृत्तीवेतन निधी (सुधारणा) नियम 2023 अधिसूचित केले आहेत.
एनपीएस विश्वस्त नियमावलीतील सुधारणांमुळे विश्वस्तांची नियुक्ती, त्यांच्या अटी व शर्ती, विश्वस्त मंडळाच्या बैठका घेणे आणि एनपीएस विश्वस्त मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती यासंबंधित तरतुदी सुलभ झाल्या आहेत.
निवृत्तीवेतन निधी नियमांमधील सुधारणांमुळे, कंपनी कायदा, 2013 आणि निवृत्तीवेतन निधीद्वारे वाढीव प्रकटीकरणानुसार निवृत्तीवेतन निधीच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी सुलभ झाल्या आहेत.
इतर लक्षणीय सुधारणांमध्ये हे समाविष्ट आहेः
- निवृत्तीवेतन निधी आणि निवृत्तीवेतन निधीच्या प्रायोजकांच्या भूमिकांची स्पष्टता आणि ‘पात्र आणि योग्य व्यक्ती’ निकषांचे पालन करणे.
- निवृत्तीवेतन निधीद्वारे लेखापरीक्षण समिती आणि नामांकन तसेच मोबदला समिती यासारख्या अतिरिक्त मंडळ समित्यांची स्थापना.
- नावाच्या कलमात ‘निवृत्तीवेतन निधी’ या नावाचा समावेश आणि 12 महिन्यांच्या कालावधीत या तरतुदींचे पालन करण्यासाठी विद्यमान निवृत्तीवेतन निधीची आवश्यकता.
- संचालकांच्या जबाबदारीचे विवरण समाविष्ट असणाऱ्या निवृत्तीवेतन निधीद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या योजनांचा वार्षिक अहवाल
सुलभीकरण आणि अनुपालन कमी करणे हा प्रमुख क्षेत्रांतील सुधारणांचा उद्देश आहे. सुधारित नियमांच्या तपशीलवार माहितीसाठी, कृपया पीएफआरडीएच्या संकेतस्थळाला भेट द्याः
एनपीएस न्यास: https://www.pfrda.org.in/myauth/admin/showimg.cshtml?ID=2883
निवृत्तीवेतन निधी: https://www.pfrda.org.in/myauth/admin/showimg.cshtml?ID=2891
वरील सुधारणा, अनुपालनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी नियमांचा आढावा घेण्याकरिता, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 च्या घोषणेच्या अनुषंगाने आहेत.