येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यात पाणी प्रश्न पेटताना दिसत असून भाजप नेत्या अमृता पवार यांच्यावर येवल्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जानेवारी महिन्यात पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चारीला पाणी दिले नाही म्हणून त्यांचे गेट तोडून पाणी सोडणाऱ्या भाजपच्या नेत्या अमृता वसंत पवार यांच्यावर येवला तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महिन्याभरापूर्वीच्या घटनेची तक्रार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावातून आत्ता महिनाभर उशिराने दिल्याची चर्चा होत आहे. यावेळी पोलीस स्थानकात अमृता पवार या नोटीस घेण्यासाठी आले असताना यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली.
शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही ते मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल त्यामुळे कितीही गुन्हे दाखल झाले तरी अमृता पवार मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या अमृता पवार यांनी दिली आहे.