इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ‘एक्स’वर एक दीर्घ पोस्ट लिहिली असून, त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वागण्यामुळे चव्हाण यांना काँग्रेस सोडावी लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
चव्हाण हे पक्षासाठी निश्चितच संपत्ती होती. कोणी ‘ईडी’ला मुळे चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याचे म्हणत आहेत. ही सगळी घाईची प्रतिक्रिया आहे. एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होऊन त्यांनवी पक्ष सोडल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख पटोले यांच्याकडे आहे. निरुपम म्हणाले, की चव्हाण यांनी वेळोवेळी सर्वोच्च नेतृत्वाकडे केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती, तर परिस्थिती उद्भवली नसती. चव्हाण हे कुशल संघटक आहे. ते मैदान मारणारे नेते आहेत. गेल्या वर्षी ‘भारत जोडो’ यात्रा नांदेडमध्ये असताना नेतृत्वाने त्यांची क्षमता अनुभवली होती. त्यांनी काँग्रेस सोडल्याने आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोणीही करू शकणार नाही.
निरुपम यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, तरी ज्या नेत्याला त्यांनी जबाबदार धरले आहे, ते नाना पटोले आहेत. माजी मंत्री नितीन राऊत यांनीही तोच सूर लावला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राऊत यांनी थेट पटोले यांना इशारा दिला आहे. चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने काँग्रेस सोडणे ही दुःखकारक असल्याचे त्यांनी सांगितले.