बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करा…नितीन गडकरी यांचे आवाहन

by India Darpan
फेब्रुवारी 13, 2024 | 1:02 am
in राज्य
0
DSC 4334 01

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – सरकारी सेवेत रुजू झालेल्या तरुणांनी समाज जीवनात बदल घडविण्याचा उद्देश ठेवावा आणि जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना केले.

केंद्र सरकारच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या देशभरातील १ लाखांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. नागपुरात सीआरपीएफ कॅम्पच्या मेन्स क्लब हॉलमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तरुणांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणु ऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यासारखी विविध सरकारी मंत्रालये तसेच विभागांचा समावेश आहे. गडकरी म्हणाले, ‘सरकारी नोकरीच्या माध्यमातून एका नव्या क्षेत्रात तरुणांचे पाऊल पडले आहे. ही एक उत्तम संधी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सरकारी सेवेला ‘कर्मयोगी’ म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. कारण तुम्हाला समाजाच्या कल्याणाचे कार्य करायचे आहे. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचे जीवन कसे सुसह्य होईल, यासाठी आपल्या नोकरीच्या माध्यमातून प्रयत्न करायचे आहेत.’ यावेळी डीआयजी लोकेंद्र सिंह, जी.डी. पंढरीनाथ यांच्यासह सीआरपीएफ अधिकाऱ्यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दगाफटका झाल्याने राजकीय वनवास, पंकजा मुंडे यांचे शल्य; टीकेचा रोख कुणाकडे?

Next Post

पटोले यांच्यामुळे चव्हाण भाजपात? संजय निरुपम यांची ही पोस्ट चर्चेत

India Darpan

Next Post
Untitled 39

पटोले यांच्यामुळे चव्हाण भाजपात? संजय निरुपम यांची ही पोस्ट चर्चेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011