इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला. वनवास माझ्या वाट्याला आला, अशी सल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
‘गाव चलो अभियाना’च्या सुरू आहे. या अभियानाच्या वेळी पंकजा यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की मला तुम्ही वाघीण म्हणाला, मी वाघिणीसारखीच जगेन. राजकारणात दगाफटका झाला. माझा वनवास वाट्याला आला; परंतु ही व्यथा व्यक्त करताना कुणी दगाफटका केला आणि कुणामुळे वनवास आला, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
पंकजा यांनी राजकीय कारकीर्दीवर देखील भाष्य केले. २०१४ ची निवडणूक दुर्दैवाने वाईट ठरली. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर काही दिवसात ते आपल्यातून गेले. मुंडे साहेबांनी जातीपातीचे राजकारण न करण्याची शिकवण दिली. आपली जात केवळ वंचित आहे. त्यांच्यासाठी काम करण्याचा निर्धार पंकजा यांनी केला.