नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बुधवार दिनांक 31 जानेवारी, 2024 रोजी सुरू झालेले संसदेचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन, आज, 10 फेब्रुवारी, 2024 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की या अधिवेशनात 11 दिवसांच्या कालावधीत 9 सत्रे झाली. अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढविण्यात आला.
या अधिवेशनात एकूण 10 विधेयके (लोकसभेत 7 आणि राज्यसभेत 3) मांडण्यात आली. लोकसभेने 12 विधेयके मंजूर केली आणि राज्यसभेने 12 विधेयके मंजूर/परत केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित/परत केलेल्या विधेयकांची एकूण संख्या देखील 12 आहे, केन्द्रीय मंत्री म्हणाले.