बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यातील साकव बांधकामांसाठी १३०० कोटींचा निधी

by India Darpan
फेब्रुवारी 8, 2024 | 8:54 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
unnamed 2024 02 08T205121.144


कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यातील साकव बांधकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला १३०० कोटींचा निधी देण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चिरकाल टिकणारी विकासकामे करा, ही कामे दर्जेदार पद्धतीने करुन कोणत्याही कामाविषयी नागरिकांना तक्रार करण्याची संधी देवू नका, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यात झालेल्या विविध विकासकामांचे आभासी पद्धतीने लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली फित कापून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार अमल महाडिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, सत्यजित कदम, महेश जाधव, राहुल चिकोडे, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांची चित्रफित दाखविण्यात आली.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अनेक विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. ‘सारथी’ उपकेंद्राची इमारत व याठिकाणी ५०० मुले व ५०० मुलींचे वसतीगृह, ग्रंथालय बांधकामासाठी १७६ कोटी रुपये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीसाठी १७४ कोटी, सीपीआर मधील विविध इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४३ कोटी, दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाला १६ कोटी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑडिटोरियम अंतर्गत विविध कामांसाठी ९ कोटी ५० लाख रुपये यांसह अनेक कामांसाठी मंजूरी देण्यात आली असून ही कामे लवकरच सुरु होत आहेत, असे सांगून श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी १ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून यालाही शासन स्तरावर मंजूरी देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागात काम करताना राष्ट्रसेवेची संधी समजून उत्तम काम करा, असे आवाहन त्यांनी या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, कोणत्याही भागाचा विकास होण्यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण होणे गरजेचे असते. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. जिल्ह्यासह राज्यातील रस्ते दर्जेदार पद्धतीने तयार व्हावेत, यासाठी बांधकाम विभागाकडून भरघोस निधीची तरतूद व्हावी.

वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने शहरांतर्गत रस्तेही चांगल्या पद्धतीने व्हावेत, पुलांची उंची वाढवावी, अशी अपेक्षा माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली. अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या विविध कामांची माहिती दिली. कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव यांनी आभार मानले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्री यांचे हस्ते उद्घाटन संपन्न…हे संघ झाले सहभागी

Next Post

या व्यक्तींची आर्थिक गणिते जुळण्याची शक्यता…जाणून घ्या, शुक्रवार ९ फेब्रुवारीचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते जुळण्याची शक्यता…जाणून घ्या, शुक्रवार ९ फेब्रुवारीचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011