इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत काल निर्णयावर दिल्यानंतर आज शरद पवार गटांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तीन नव्या नावाचे प्रस्ताव दिले होते. त्यात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार या नावांचा समावेश होता. निवडणूक आयोगाने यापैकी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार याला मान्यता दिली आहे. निवडणूक आय़ोगाने दिलेले हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत मर्यादीत राहणार आहे. त्याची मुदत २७ फेब्रुवारी पर्यंत असेल. त्यानंतर पुन्हा तीन नावाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.
हे नाव मिळाल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर सांगितले की, ECI ने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ओळखले जावे यासाठी अंतरिम व्यवस्था केली आहे – शरदचंद्र पवार. तरीही पूर्ण न्याय मिळवण्यासाठी आम्ही संबंधित मंचाकडे जाणार आहोत.
राष्ट्रवादी नाव व चिन्ह हे अजित पवार यांना दिल्यानंतर शरद पवार गटाला आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तीन नव्या नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव देण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यासाठी आज सायंकाळची मुदत दिली होती. त्यानंतर शरद पवार गटाकडून तीन नावांचे प्रस्ताव देण्यात आले. त्यातील एकाला आज मान्यता दिली.