गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक जिल्हास्तरीय स्पर्धेत १ हजार ४०० स्पर्धकांचा सहभाग

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2024 | 5:16 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240205 WA0278


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात टिकुन राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासुनच प्रयत्नशील रहावे. आपली कला, संस्कृती व गुणवत्ता सिद्ध करून भविष्यात आपले करीअर घडवावे तसेच प्रत्येक क्षेत्रात मिळणाऱ्या संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. नाशिक येथील स्व.मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा अतंर्गत जिल्हा स्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नाशिक जिल्हयातील पंधरा तालुक्यातील सुमारे १ हजार ४०० पेक्षा अधिक खेळाडू व प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक , शिक्षक व पालकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी सहभागी स्पर्धकांनी शानदार संचलन करुन प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली यावेळी जेम्स इंग्लिश मेडियम स्कुलच्या बँड पथकांनी तालबध्द साथ दिली. संचलनाव्दारे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील खेळाडूंची शिस्तबध्दता व मुलांचा उत्साह दिसून आला. सहभागी खेळाडूंना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष मैदानावर जावून खेळाडूंशी संवाद साधला. व नाणेफेक करुन प्रत्यक्ष स्पर्धाना प्रारंभ केला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रविंद्र परदेशी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, अधिक्षक श्रीधर देवरे, धनंजय कोळी, निलेश पाटोळे, संतोष झोले, प्रशासन अधिकारी रविंद्र आंधळे, अनिल दराडे सर्व गटशिक्षणाधिकारी व सर्धा प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्ष चषक स्पर्धा दोन गटांमध्ये (लहान गट- इ. १ ली ते ५ वी व मोठा गट इ. ६ वी ते ८वी ) व १४ प्रकारात घेण्यात येत असून प्रत्येक सपर्धा प्रकारात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेले स्पर्धक व संघ सहभागी झाले आहेत. आजच्या वेळापत्रकानुसार कबड्डी मुले-मुली , खोखो मुले-मुली, वक्तृत्व लहान व मोठा गट, वैयक्तीक गीतगायन लहान व मोठा गट, वैयक्तिक नृत्य लहान व मोठा गट, समुहगान लहान व मोठा गट, समुह नृत्य लहान गट, चित्रकला लहान व मोठा गट, बुध्दीबळ लहान व मोठा गट या स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाल्या. दि ६ रोजी धावणे, समूहगीत गायन व समूहनृत्य मोठा गट, स्पेलिंग बी व दिव्यांग विदयार्थ्यांच्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. मा.ना. दादाजी भूसे (मंत्री सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा) यांचे प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम दि. ६ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सायकलवरून राहुल गांधी कोळसा खाणीत

Next Post

नाशिकमध्ये ठाणे येथील महिलेच्या गळय़ातील ८० हजाराची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

India Darpan

Next Post
crime 118

नाशिकमध्ये ठाणे येथील महिलेच्या गळय़ातील ८० हजाराची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

ताज्या बातम्या

accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011