येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -येवला तालूका पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची वाहतूक करणा-या टोळीला ताब्यात घेतले आहे. तालूका पोलिसांना अंमली पदार्थ घेऊन लाल रंगाची गाडी जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर ही कारवाई केली.
येवला-मनमाड रस्त्यावर गोपाळवाडी शिवारात सापळा रचत संशयितरित्या असलेली गाडी आढळून आल्यावर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत दोन पिशव्यां मध्ये १४ किलो १ लाख रुपयांचा गांजा मिळाला.
त्यानंतर पोलिसांनी गांजासह गाडी जप्त केली असून याप्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा गांजा कोणाला देण्यासाठी कुठे जात होता याचा तपास आता पोलिस करीत आहे.