बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमळनेर येथे झालेल्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हे झाले १० ठराव

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2024 | 6:18 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240108 WA0237 2

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमळनेर येथे झालेल्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हे दहा ठराव झाले आहे.
१) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दुःखद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मांडत आहे.
२) ग्रामिण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालक ह्यांच्या अडचणी वाढत आहेत. यावर सरकारने परिणामकारक योजना कराव्यात अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- डॉ. रविंद्र शोभणे
अनुमोदक :- श्री. अशोक बेंडखळे

३) मराठीसह सर्व भारतीय भाषांची आकाशवाणी दिल्ली येथून प्रसारीत होणारी राष्ट्रीय वार्तापत्रे त्या-त्या राज्यांच्या राजधानीत पाठविण्यात आली त्यामुळे त्या भाषांचे दिल्लीतील राष्ट्रीय स्थान संपुष्टात आले आहे. ही वार्तापत्रे पुन्हा दिल्लीहून प्रसारीत व्हावी अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- डॉ. श्रीपाद जोशी
अनुमोदक :- श्री. प्रकाश पागे

४) गुजराथी, मराठी शब्दकोशाची आवृत्ती सुधारून परत तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- श्री. संजय बच्छाव
अनुमोदक :- श्रीमती शैलजा जोशी

५) बृह्नमहाराष्ट्रातील मराठी शिक्षण संस्थांना आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने एक रकमी अनुदान द्यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- श्री. गुरैय्या स्वामी
अनुमोदक :- श्री. रमेश वंसकर

६) काळाच्या ओघात कान्हादेशाचे अपभ्रंश होऊन खान्देश असे नामकरण झाले आहे ते पूर्ववत कान्हादेश असे करण्यात यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- अॅड. पंकज गोरे
अनुमोदक :- श्री. जगदिश देवपुरकर

७) अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे प. पूज्य साने गुरूजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने करावी अशी मागणी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- डॉ. अविनाश जोशी
अनुमोदक :- श्री. निरज अग्रवाल

८) कान्हादेशाचे वैभव असलेल्या प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने करावी अशी मागणी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- डॉ. धनंजय दिक्षीत
अनुमोदक :- डॉ. अविनाश जोशी

९) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक विचारवंतांनी पुरावे दिले आहेत आणि साहित्य संस्थांनी लोक चळवळ उभारून हा विषय ऐरणीवर आणला आहे, तरीही महाराष्ट्र शासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून त्याचा पाठपुरावा होतांना दिसत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- प्रा. डॉ. नरेंद्र पाठक
अनुमोदक :- श्री. प्रदीप दाते

१०) जळगांव व धुळे जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणारे पाडळसे धरण केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट करून तसा प्रस्ताव केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट होणेसाठी महाराष्ट्र शासनाने त्वरीत पाठवावा अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- श्री. नरेंद्र निकुंभ
अनुमोदक :- श्री. अशोक बेंडखळे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधानांनी आसाम मधील गुवाहाटी येथे ११ हजार कोटीच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

Next Post

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त सिटीलिंकच्यावतीने जादा बसेस

India Darpan

Next Post
Nashik city bus 3 e1700490291563

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त सिटीलिंकच्यावतीने जादा बसेस

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011