इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कट
भारतीय आईस्क्रीम उद्योगाला नव्या स्तरावर नेण्यासाठी त्यांना विशेष प्रोत्साहन योजना राबवून एका नव्या स्तरावर नेण्यासाठी व भारतीय बरोबरच परदेशात बाजार पेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांना दिले.
भारतीय आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भारतातील आइस्क्रीम उद्योगाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. याप्रसंगी आयआयसीएमएचे अध्यक्ष सुधीर शाह, राजेश गांधी, उपाध्यक्ष ए बालाराजू , सचिव आशिष नहार, सहसचिव चेतन भल्ला, खजिनदार प्रदीप पै व एल के नरसिंहमन उपस्थित होते.
याप्रसंगी आईसक्रीम उद्योगांचा व्यवसाय ५ बिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट्य असोसिएशनचे असून आईसक्रीम उद्योगांचे वितरण व्यवस्था, दर्जेदार उत्पादन, निर्यात क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे व आईसक्रीम उद्योगांसमोर असलेले आव्हाने यावर चर्चा करण्यात आली.
या उद्योगांना असलेल्या जीएसटी व इतर शासकीय कर कमी करून बाहेरील देशांसोबत कशा पद्धतीने व्यवसाय वाढविता येईल तसेच या उद्योगातील नवीन उद्योजकांना भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विशेष प्रशिक्षणासोबतच लवकरच भारतात “आईसक्रीम दिन” साजरा करण्यासाठी असोसिएशनतर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना दिली.
भारतीय आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कामाचे राष्ट्र्पतींनी कौतुक करत या उद्योगाला देशात महत्वाचे स्थान आहे व आईसक्रीम हे प्रेम व आनंदाचे प्रतीक असल्याचे सांगत लवकरच आईसक्रीम उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रपतींनी दिले.