नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -‘एक राष्ट्र एक निवडणूक’ शी संबंधित उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राजकीय पक्षांशी सल्लामसलतीचा एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी या दोघांनी या विषयाबाबत आपली मते मांडली.
कोविंद यांनी राष्ट्रीय लोक जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्यासह पक्षाच्या इतर दोन सदस्यांशी देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत त्यांचे विचार आणि सूचना जाणून घेण्याबाबत सल्लामसलत केली.
पक्षांच्या प्रतिनिधींनीही त्यांच्या सूचना लिखित स्वरूपात सुपूर्द केल्या. तत्पूर्वी ३० जानेवारी रोजी कोविंद यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांची भेट घेतली आणि या विषयावर त्यांचे मत जाणून घेतले.