नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस 25 जानेवारी हा आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक करणे हाच राष्ट्रीय मतदार दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. जागरूक मतदार हा सशक्त लोकशाहीचा कणा आहे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित 14 व्या राष्ट्रीय मतदान दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,नाशिक जितीन रहेमान, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, हिरामण झिरवाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, तहसिलदार(निवडणूक) मंजुषा घाटगे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार व प्रशिक्षणर्थी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यावेळी म्हणाले, भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकशाहीला निवडणूकीच्या माध्यमातून पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. मतदार जनजागृती कार्यक्रमात व मतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ठ योगादानाबाबत राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे नाव अधोरेखित झाले आहे. ही अत्यंत गौरवास्पद बाब असून यात जिल्हाधिकारी यांच्यासह या प्रक्रीयेत सहभागी असणारे अधिकारी, कर्मचारी, मेहनतीचे हे फलित आहे. मतदार यादी पर्यंत आपण निश्चितच चांगले काम केले आहे पण यापुढील येणाऱ्या काळातील महत्वाचा टप्पा निवडणूक कार्यक्रम सर्वांच्या सहभागतून आपण यशस्वी करू असा विश्वास अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यस्तरावरील चांगल्या कामगिरीसोबत येणाऱ्या काळात स्त्री मतदार नोंदणी वाढविण्यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही श्री. पारधे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे प्रास्ताविकात म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाहीचा स्वीकार केला. या लोकशाही पद्धतीत निवडणूका या निर्भय व स्वच्छ वातावरणात झाल्या पाहिजेत यादृष्टीने भारताच्या राज्यघटनेत तशी तरतुद करण्यात आली आहे. यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आगोदर म्हणजेच 25 जानेवारी 1950 रोजी भाारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. सर्वांच्या सहकार्यातून 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या एका वर्षात सर्वांनी उत्तम कामगिरी केली आहे. यात 2 लाख 30 हजार फॉर्म न 6 नवीन मतदार नोंदणीसाठी प्राप्त झाले होते. यातून आपण 2 लाख 14 हजार 300 फॉर्म स्वीकृत केले आहेत. अपात्र व मयत असेलेले एकूण 1 लाख 1 हजार 15 नावे वगळण्यात आली आहेत. व 114 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. सन 2024 हे अतिशय महत्वाचे वर्ष असून या वर्षात लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. मतदार जनजागृती व नवमतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरावर जिल्ह्यास गौरविण्यात आले यात सर्वांच्या मेहनतीचा वाटा आहे. यात प्रशासनासोबतच सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व सुजाण नगारिक यांचेही सहकार्य महत्वाचे असल्याचे डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी यावेळी विषद केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ उपस्थितांना दिली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या संदेशाची चित्रफित यावेळी प्रसारित करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनिय कामगिरीबाबत अधिकारी, सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्था यांना पुस्काराने यावेळी गौरविण्यात आले. यावेळी के.टी.एच.एम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीपर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसिलदार(निवडणूक) मंजुषा घाटगे यांनी केले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, स्वाती थविल यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन व के.व्हि.एन नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच वर्शिप फाउंडेशनचे विद्यार्थी पथदिंडीत सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हानिवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसिलदार (निवडणूक) मंजुषा घाटगे, निवडणूक नायब तहसिलदार राजेश अहिरे, प्रज्ञा कुलकर्णी व जिल्हा निवडणूक कार्यालयातील कर्मचारी मोठ्या उपस्थित होते.
उल्लेखनिय कामगिरीबाबत यांचा झाला सत्कार
मतदार नोंदणी अधिकारी
जितीन रहमान, सहायक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी नाशिक,
आप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 122 दिंडोरी, उपविभागीय अधिकारी दिंडोरी
बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 119 येवला,उपविभागीय अधिकारी येवला,
सहायक मतदार नोंदणी अधिकारी
- मंदार कुलकर्णी, तहसिलदार, तहसिल, चांदवड
- सुरेंद्र देशमुख, तहसिलदार, तहसिल, सिन्नर
- प्रशांत कुलकर्णी, तहसिलदार, तहसिल, सुरगाणा
नायब तहसिलदार
- राहूल मुळीक,नायब तहसिलदार, तहसिल निफाड
- श्रीमती मिनाक्षी गोसावी, नायब तहसिलदार, तहसिल, चांदवड
- एल. एन. जाधव, नायब तहसिलदार, तहसिल, कळवण
- विलास वैद्य, नायब तहसिलदार, तहसिल, सिन्नर डाटा एन्ट्री ऑपरेटर
- विकी शेलार, डाटा एंन्ट्री ऑपरेटर, 123 नाशिक (पूर्व) विधानसभा मतदार संघ
- धिरज अहिरे, डाटा एन्ट्री ऑपरेटर, 115 मालेगांव बाहय विधानसभा मतदार संघ
- सचिन थोरात, डाटा एंन्ट्री ऑपरेटर, 113 नांदगांव विधानसभा मतदार संघ
- लक्ष्मण गायकवाड़, डाटा एंन्ट्री ऑपरेटर, 117 कळवण विधानसभा मतदार संघ
शैक्षणिक संस्था
- संजय सानप, प्राचार्य, के.व्हि.एन. नाईक आर्टस/कॉमर्स, नाशिक
- संभाजी पाटील, प्राचार्य, के. के. वाघ कॉलेज, नाशिक आर्टस / सायन्स
- डॉ. किरण रकीबे, प्राचार्य, के.पी.जी.कला /वाणिज्य/विज्ञान कॉलेज इगतपुरी
सामाजिक संस्था
- श्रीमती आसावरी देशपांडे, जिल्हा समन्वयक, प्रवरा मेडीकल ट्रस्ट, नाशिक
- बबलू मिर्झा, अध्यक्ष, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण संघटना नाशिक
- सलमा गुरु, अध्यक्ष, मानवता किन्नर समाजसंस्था नाशिक
- सागर बोडके, pwd lcon नाशिक जिल्हा
मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (B.L.O)
- तुषार बोऱ्हाडे, नांदगाव, (113)
- जमील अहमद हिशामुद्दीन, मालेगाव मध्य, (114)
- जितेंद्र महावीर बरेलीकर, मालेगाव बाहय, (115)
- पी.एल. ठाकरे, बागलाण (अ.ज), (116)
- गंगाधर बाबुराव साबळे, कळवण (अ.ज), (117)
- अजय बळी निटुरे, सुरगाणा, (117)
- गोकुळ हिंम्मतराव वाघ, चांदवड, (118)
- रविंद्र कोंडाजी शंळके, येवला, (119)
- जनार्दन मारूती केकरे, सिन्नर, (120)
- संजय काशिनाथ जाधव, निफाड, (121)
- पाहुबा आत्माराम पाटील, दिंडोरी (अ.ज), (122)
- श्रीमती कलावती जाधव, नाशिक पूर्व, (123)
- श्रीमती. रश्मी गांगुर्डे, नाशिक मध्य, (124)
- प्रभाकर महादू मगर, नाशिक पश्चिम, (125)
- श्रीमती कविता भगवान बच्छाव, देवळाली (अ.जा), (126)
- अशोक सिताराम खाडे, इगतपुरी (अ.ज), (127)
- दिनकर अंबादास जगझाप, त्रंबकेश्वर, (127)
राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम 2024 राबविणेबाबत EPIC वाटप
123 नाशिक पुर्व मधील नव मतदार
- प्रथमेश भास्कर साबळे
- प्रियंका भास्कर साबळे
- जानवी संतोष गांगुर्डे
- सुमित शाम धोत्रे
EPIC वाटप 125 नाशिक पश्चिम मधील नव मतदार
- शुभांगी क्षिरसाठ
- नंदिनी गांगुर्डे
- धिरज राजपुत
- रसिक निकम