रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दाट धुक्यामुळे ट्रक आणि टेम्पोमध्ये अपघात…१२ जण जागीच ठार

by India Darpan
जानेवारी 25, 2024 | 3:23 pm
in संमिश्र वार्ता
0
accident 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात दाट धुक्यामुळे ट्रक आणि टेम्पोची धडक झाली. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या प्रियजनांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फर्रुखाबाद रस्त्यावर ट्रक आणि टेम्पोमध्ये हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारा ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. टेम्पोमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. सेहरा मऊ दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ट्रकच्या धडकेने टेम्पोचे तुकडे झाले. पोलिस येण्यापूर्वी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे चालक आणि प्रवाशांनी अपघातस्थळी बचावकार्य सुरू केले. भरधाव ट्रकच्या धडकेने टेम्पोचा चक्काचूर झाला. टेम्पोचे काही भाग तुटून रस्त्यावर विखुरले.

या भीषण अपघातानंतर इतर वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. याशिवाय जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी शाहजहांपूरमध्ये भरधाव येणाऱ्या ट्रकखाली स्कूटरस्वार चिरडवला होता. स्कूटरस्वार ट्रकच्या चाकाखाली आला होता. त्याला ट्रकसह सुमारे १०० मीटरपर्यंत ओढले गेले. या भीषण घटनेत स्कूटरस्वाराला आपला जीव गमवावा लागला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया आघाडीला पुन्हा मोठा धक्का…..नितीशकुमार विधानसभा भंग करून भाजपसोबत जाणार ?

Next Post

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा…उल्लेखनिय कामगिरीबाबत झाला यांचा सत्कार

Next Post
IMG 20240125 WA0296 e1706177690877

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा…उल्लेखनिय कामगिरीबाबत झाला यांचा सत्कार

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011