बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव बस स्थानकाचे रुपडे पालटणार; इतक्या कोटीच्या निधीला मिळाली प्रशासकीय मान्यता

by India Darpan
जानेवारी 24, 2024 | 4:50 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 175


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाच्या वतीने ४ कोटी ८० लाख तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत एमआयडीसीच्या माध्यमातून बसस्थानकाचे सौंदर्यीकरण योजनेतून बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १ कोटी ९० लाख असे अशा एकूण ६ कोटी ७० लाखांच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी होऊन प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

लासलगाव बसस्थानकाचे बांधकाम सन १९७५ मध्ये झालेले आहे. सदर बसस्थानकाला सुमारे ४९ वर्षे झाल्यामुळे या बसस्थानकाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा व शेतमालाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बसस्थानकातून दररोज ५३ बसेस सुटतात तर ५० हून अधिक खेड्यांमधील प्रवाशी या स्थानकाचा लाभ घेतात. मात्र या बसस्थानकामधील असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने या बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता होती. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या माध्यमातून लासलगाव बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ४ कोटी ८० लाख तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियांनांतर्गत एमआयडीसीच्या माध्यमातून बसस्थानकाचे सौंदर्यीकरण योजनेच्या माध्यमातून बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शासनाच्या वतीने लासलगाव बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ कोटी ८० लक्ष रुपये निधीतून येथील बसस्थानकाचा तळमजला व पहिला मजला विकसित करण्यात येणार आहे. तसेच येथील बसस्थानकात नागरिकांना पिण्यासाठी तसेच वापरासाठी पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटिंग यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियांनांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडलाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या १ कोटी ९० लाखांच्या निधीतून बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण करण्यात येऊन सुसज्ज असे बसस्थानक विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिशय दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जळगावातील या दोन काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश…एकनाथ खडसेंना चेकमेट

Next Post

मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टाची नोटीस…सदावर्ते यांच्या याचिकेवरुन दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
manoj jarange

मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टाची नोटीस…सदावर्ते यांच्या याचिकेवरुन दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011