इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण पदयात्रा रांजणगाववरून पुण्याकडे रवाना झाली. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी, २६ जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा. जर मुंबईत त्रास झाला, तर मंत्र्यांना घेराव घाला, असा संदेश दिला.
यावेळी ते म्हणाले की, मुंबईत शांततेत दोन दिवस बसलो आणि त्रास झाला तर मात्र मंत्र्यांना घेराव घाला असे ते म्हणाले. मराठा आरक्षणातून समाजाची मुले अधिकारी होताना पाहायचे स्वप्न आहे. मी तुमच्यात असेल नसेल, तरी विचार मरू देऊ नका. एकजूट फुटू देऊन नका, अशी कळकळीची विननंती त्यांनी मराठा समाजाला केली आहे. समाजकारण सोडून राजकारणात जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. कोणतीही निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, की आरक्षण न घेता आता मराठे मोकळ्या हाताने परत जाणार नाहीत.
जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचा उल्लेख पुन्हा एकदा येडपट असा केला. एकदा आरक्षण मिळू द्या, मग त्यांच्यात किती मस्ती आहे ते बघतोच. जातीच्या वाटेला जो जाईल, त्याचा उभा कार्यक्रमच करू, असा इशारा त्यांनी दिला.