इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुवाहाटीःअयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान रस्त्यावरच ठाण मांडून महात्मा गांधी यांचे रघुपती राघव राजाराम हे भजन गायले. मुख्यमंत्री हेमंत विसवा सरमा यांनी त्यांना मंदिरात जाण्यास मनाई केली, म्हणून राहुल गांधी यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेशचा दौरा केल्यानंतर राहुल गांधी आसाममध्ये पोहोचले आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त ते बटाद्रवा येथील श्रीमंत शकरदेव यांच्या जन्मस्थानी दर्शनासाठी जात होते; मात्र आसाम सरकारने त्यांना तेथे जाण्यापासून रोखले. अशा स्थितीत राहुल गांधी, जयराम रमेश आणि इतर काँग्रेस नेते रस्त्यावरच धरणे धरून बसले आणि ‘रघुपती राघव राजाराम’चे सूर गाऊ लागले. तीन वाजण्यापूर्वी मंदिरात जाण्यापासून रोखण्यात राहुल यांना आले. काँग्रेस नेते रघुपती राघव राजा राम रस्त्यावर बसून गाणे आणि टाळ्या वाजवत होते.
त्यांनी आसाम सरकारचा निषेध केला. त्या वेळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांना श्रीमंत शकरदेव यांच्या जन्मस्थानाला भेट देऊ नये, असा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, की राम मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी मंदिरात कोणत्याही प्रकारची अराजकता माजवायची नाही.