इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्या येथे श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. अयोध्या धाम मे विराजे श्रीराम असे सांगत आज हा धार्मिक सोहळा पार पडला. आज भाविकांची सकाळपासून मंदिर परिसरात गर्दी सुरु झाली. त्यानंतर आमंत्रीत हळूहळू राम मंदिर परिसरात आले. या सर्व सोहळ्याचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर लाईव्ह बघता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमाराला अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले. पंतप्रधानांचा चार तासाचा अयोध्या दौरा असणार आहे. त्यांचे सकाळी १०.२५ वाजता अयोध्या एअरपोर्टवर आगमन झाले. त्यानंतर १०.५५ वाजता ते राम जन्मभूमि येथे त्यांचे आगमन झाले. दुपारी १२.२० ते १ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते उपस्थितीत राहिले. यानंतर दुपारी आता ते १ वाजता संबोधन करतील त्यानंतर २.१० वाजता ते कुबेर टीलाचे दर्शन घेतील.
ऐतिहासिक अशा या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक समुहांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्याला उपस्थित आहेत.
श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान दिलेल्या श्रमिकांशी पंतप्रधान संवाद साधणार आहे. कुबेर टिला इथल्या भगवान शिवशंकराच्या जीर्णोद्धार झालेल्या प्राचीन मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. या जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात दर्शन घेऊन ते पूजाही करणार आहेत.