इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काबूलः मॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानच्या बदख्शानच्या वाखान भागात कोसळले. फाल्कन १० विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळले. हे विमान भारतीय असून ते भारतातून रशियाला गेले होते, असा दावा अफगाणिस्तानच्या माध्यमाने केला; परंतु नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) भारतीय विमान असल्याचा दावा फेटाळून लावला.
अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले विमान भारताचे नाही. ते भारतातील गया येथून रशियातील झुकोव्स्की येथे जात होते. त्यावर चार क्रू मेंबर्ससह सहा लोक होते. हे विमान बदख्शान जिल्ह्यातील तोफखाना भागात कोसळले होते. क्रॅश झालेले विमान हे चार्टर विमान आहे. अपघातग्रस्त विमान भारतात नोंदणीकृत नाही. त्याची नोंदणी रशियात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बेपत्ता फाल्कन १० विमानात ४ क्रू मेंबर्स आणि २ प्रवाशांसह ६ लोक होते. ते रशियाचे होते.