बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राम मंदिरामुळे एक लाख कोटींचा व्यवसाय…‘कॅट’चे राष्ट्रीय सरचिटणीसांनी दिली ही माहिती

by India Darpan
जानेवारी 21, 2024 | 6:27 pm
in संमिश्र वार्ता
0
pEQoUezG 400x400

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयाची जय्यत तयारी सुरू आहे. या वातावरणाचा व्यापारी जगतालाही मोठा फायदा होत आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या संघटनेने राम मंदिर उद्‌घाटनामुळे देशभरातील व्यापाऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय झाला आहे.

‘कॅट’ च्या म्हणण्यानुसार, राम मंदिरामुळे गेल्या काही दिवसांत व्यापाऱ्यांनी एक लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. व्यापारी मंडळी ही मोहीम राबवत आहेत. ‘कॅट’ने सांगितले, की व्यापारी समुदायामध्ये ‘हर शहर अयोध्या-घर घर अयोध्या’ ही राष्ट्रीय मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिल्ली आणि देशातील सर्व राज्यांतील व्यापारी संघटनांनी २२ जानेवारी रोजी आपापल्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. हे सर्व कार्यक्रम बाजारपेठेतच होतील, त्यामुळेच उद्या दिल्लीसह देशातील सर्व बाजारपेठा खुल्या राहतील आणि व्यापारी सर्वसामान्यांसोबत श्री राम मंदिराचा उत्सव साजरा करतील.

‘कॅट’चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले, की सोमवारी दिल्लीत २ हजारांहून अधिक छोटे-मोठे कार्यक्रम होणार आहेत. देशभरात ३० हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांनी दावा केला – या शतकातील हा सर्वात मोठा दिवस असेल, जेव्हा एकाच दिवशी अनेक कार्यक्रम होतील. त्यांनी सांगितले की, आज घरे, बाजार, मंदिरे आणि इतर ठिकाणे सजवण्यासाठी फुलांची मागणी खूप वाढली आहे. मातीचे दिवे विकत घेण्यासठी लोकांचाही ओघ कायम आहे. मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. लोक प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत आहेत. बाजारात राम झेंडे आणि राम फलकांचा तुटवडा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरिचल मुनई या राम सेतूच्या प्रारंभ स्थानाला पंतप्रधानांनी दिली भेट…असे आहे महत्त्व

Next Post

मॉस्कोला जाणारे विमान कोसळले; सहा जण गायब

Next Post
Untitled 148

मॉस्कोला जाणारे विमान कोसळले; सहा जण गायब

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011