मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून ऑनलाईन ऑर्डर करून मागवलेल्या शाकाहारी पदार्थात मेलेला उंदीर आढळल्यामुळे प्रयागराजमधील राजीव शुक्ला यांना ७५ तास रुग्णालयात राहावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान या रेस्टॉरंटने मात्र असा प्रकार झाला नसल्याचे सांगितले आहे.
शुक्ला हे काही कामानिमित्त मुंबईला आले होते. ते एका हॉटेलला मुक्कामी होते. त्यांनीन मुंबईतील बार्बेक्यू नेशनमधून ऑनलाईन शाकाहारी पदार्थ मागवले होते. ऑर्डर आली. शुक्ला यांनी जेवणाचे डब्बा उघडले. त्यानंतर त्यांना डाळीच्या डब्ब्यात मेलेला उंदीर आढळला. तोपर्यंत त्यांचे बरेच खाणे झाले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यासाठी त्यांना ७५ तासांहून अधिक रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.
याप्रकरणी शुक्ला यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे; परंतु पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. शुक्का यांनी ट्विट करत सांगितले की, प्रयागराज येथील मी राजीव शुक्ला (शुद्ध शाकाहारी) मी मुंबईला भेट दिली, ८ जानेवारी’ २४ रोजी रात्री बारबेक्यू नेशन, वरळीच्या आउटलेटमधून शाकाहारी जेवणाचा डबा मागवला, ज्यामध्ये मृत उंदीर होता, ७५ तासांपेक्षा जास्त तासांसाठी रुग्णालयात दाखल होतो. नागपाडा पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. कृपया मदत करा असे म्हटले आहे.ऑर्डर केला होता.
दरम्यान ‘बार्बेक्यू नेशन’च्या व्यवस्थापनान म्हटले आहे, की शुक्ला यांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांनी आमच्या एका शॉपमधून ऑर्डर केलेल्या पदार्थामध्ये मृत उंदीर आढळल्याचा आरोप केला आहे. परंतु याप्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर आणि चौकशीत आम्हाला असे काही आढळले नाही.