इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कांदा, गहू, तांदूळ, साखर यांच्यावर सध्या सुरू असलेली निर्यातबंदी उठवण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचार करत नसल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. ते काल दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. गहू आणि साखर यांची आयात करण्याची कोणतीही योजना किंवा गरज नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केले.
केंद्र सरकार मित्र राष्ट्रांना त्यांच्या अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत तसेच इंडोनेशिया, सेनेगल आणि गॅम्बिया या देशांना तांदूळ निर्यात सुरू ठेवणार असल्यातेही त्यांनी सांगितले. कांदा निर्यात बंदीला एक महिन्याहून अधिक काळ झाल्यामुळे कांदा निर्यात बंदी आता उठेल असे बोलले जात होते. पण, केंद्रीय मंत्री गोयल यांनी ही शक्यता नसल्याचे सांगितले.
कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले असून शेतक-यांमध्ये संताप आहे. असे असतांना ही निर्यात बंदी कायम राहणार असल्यामुळे शेतक-यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.