बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माधव भांडारी यांच्या अयोध्येवरील ग्रंथाचे प्रकाशन…नितीन गडकरी यांनी दिली संघर्षाची माहिती

by India Darpan
जानेवारी 14, 2024 | 4:35 pm
in स्थानिक बातम्या
0
DSC 9248 01 e1705230319216

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माण ही सर्व भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. अयोध्येचा संघर्ष मंदिर निर्माणासोबतच भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनाचा देखील संघर्ष होता. कारण अयोध्या हे भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले.

अयोध्या संघर्षाचे अभ्यासक आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या ‘अयोध्या’ या मराठी ग्रंथाच्या ‘अयोध्या – जो कभी पराजित नहीं हुई’ या हिंदी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांत शाखेद्वारे शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री डॉ. पवनपुत्र बादल, संघटन मंत्री नितीन केळकर, ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, लखनसिंह कटरे, अविनाश पाठक, नरेश सबजीवाले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

गडकरी म्हणाले, ‘अयोध्येच्या संघर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी मोठे योगदान दिले. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे त्यांनी समर्थन केले. त्यानंतर हा मुद्दा संपूर्ण देशाच्या मुख्य अजेंड्यावर आला. पुढे विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल, उमा भारती, साध्वी ऋतंभरा यांच्यासह अनेकांनी मोठा संघर्ष केला. प्रभू श्रीराम भारतीयांचे दैवत आहे आणि आपल्या दैवताचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या अयोध्येत त्यांचे मंदिर होऊ नये तर कुठे व्हावे? हे जन्मस्थान भारतीयांच्या अस्मितेचा विषय आहे. हा जातीय किंवा धार्मिक मुद्दा मुळीच नाही.’ या पुस्तकातून अयोध्येचा संघर्ष भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचणार आहे. पण तो डिजीटल माध्यमातून पोहोचले तर अधिक संयुक्तिक ठरेल, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली. माधव भांडारी हे एक चिंतनशील व्यक्तिमत्व असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत आनंदाची बातमी…

Next Post

कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याच्या शक्यतेवर पियूष गोयल यांनी दिले हे स्पष्टीकरण

India Darpan

Next Post
kanda 11

कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याच्या शक्यतेवर पियूष गोयल यांनी दिले हे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011