शुक्रवार, ऑक्टोबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बांबूंपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला राज्यपालांची भेट…

जानेवारी 9, 2024 | 7:21 pm
in राज्य
0
unnamed 2024 01 09T191930.454 e1704808281232

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वातावरणातील बदल हे जगासमोर आव्हान ठरत असताना बांबू उत्पादन यावर एक उपाय ठरणार आहे. शेतकऱ्यांचे देशाच्या प्रगतीसाठी योगदान महत्त्वाचे असून, बांबूचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीने भारताची प्रगती साधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे पर्यावरणीय शाश्वतता या दोन दिवसीय शिखर परिषदेचे फिनिक्स फाउंडेशन संस्थेच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. ‘शाश्वत भवितव्यासाठी बांबू क्षमतेचा उपयोग’ या विषयावरील सत्रात राज्यपाल श्री. बैस यांनी विचार मांडले. दरम्यान, त्यांनी बांबूंपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट देऊन उत्पादकांचे कौतुक केले.

या सत्रात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, द एनर्जी एंड रिसोर्सेज इन्स्टिट्यूटच्या महानिदेशक डॉ. विभा धवन, ‘वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे संस्थापक-विश्वस्त हेमेंद्र कोठारी, ‘मनरेगा मिशन’ चे महासंचालक नंदकुमार, वन संशोधन आणि शिक्षण भारत परिषदेचे वैज्ञानिक डॉ. अजय ठाकूर, इनसो इम्पॅक्टचे व्यवस्थापक आणि संचालक त्रेवर रीस यांनी चर्चासत्रात आपली मते मांडली.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, वातावरणीय बदलामुळे येणारे पूर आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करता यावे यासाठी बांबूचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. बांबू उत्पादन वाढविण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अनुदान देत आहे. खासगी कंपन्यांच्या सहभागाने आणि शेतकऱ्यांच्या सहाय्याने बांबू उत्पादन आणि विक्री करण्यास शासन मदत करते. बांबूचा प्रत्येक भाग हा उत्पादनासाठी वापरण्यात येतो. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारता येणार आहे.

पुढील २० वर्षात लोकसंख्या वाढत राहील. मात्र, जमीन आणि ऊर्जा त्यांच्यासाठी कमी पडेल. पुनर्वापर आणि पुनर्निर्माण हा भारतीय संस्कृतीचा भाग असून, त्याबाबत चर्चा आणि जनजागृती या परिषदेत होणे गरजेचे आहे. तसेच उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. राज्यातील विद्यापीठांनी पर्यावरण शाश्वततेच्या अध्ययनाला प्राधान्य द्यावे व विद्यापीठ परिसर कार्बन – तटस्थ करावे, अशी सूचना राज्यपालांनी केली.

उद्योजकांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्यासोबत काम करणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या सहायाने आपण पर्यावरणाचा ऱ्हास वाचवू शकतो. पर्यावरण रक्षणासाठी शेतकऱ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करावे, पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ बनविणे गरजेचे आहे. बांबू लागवडीमुळे हवेचे शुद्धीकरण होते, सांडपाण्यावर प्रक्रिया करता येते व जमिनीची धूप कमी होते असे राज्यपालांनी सांगितले.

श्री. पटेल म्हणाले की, सन २०५० पर्यंत मुंबई, कोलकाता, चेन्नई ही शहरे पाण्याखाली बुडतील, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. चेन्नई येथे अलिकडे झालेला पूर ही धोक्याची घंटा आहे. मिलिमीटर मध्ये होणार पाऊस आज फुटामध्ये होत असल्याचे सांगून पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.

‘माझी वसुंधरा अभियान’, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको, ‘टेरी’ आदी संस्थांच्या सहकार्याने परिषदेचे आयोजन करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

७५ हजार नागपूरकरांची निःशुल्क नेत्र तपासणी! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चष्मे वाटप

Next Post

जीममधून चोरी करणा-या चोरांना २४ तासात पोलिसांनी केले गजाआड…१ लाख ६३ हजाराचा मुद्देमालही केला हस्तगत

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

ELECTION
मुख्य बातमी

नाशकात एकाच घरात ८०० मतदार? खरं काय आहे? निवडणूक अधिकारी म्हणतात…

ऑक्टोबर 16, 2025
IMG 20251016 WA0036
महत्त्वाच्या बातम्या

मुख्य सचिवांनी घेतला कुंभमेळ्याचा आढावा… प्रशासनाला दिली ही तंबी…

ऑक्टोबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळीचा पहिला दिवस… जाणून घ्या, शुक्रवार, १७ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 16, 2025
Nashik city bus 3 e1700490291563
महत्त्वाच्या बातम्या

नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या… सिटीलिंक बस वाहतुकीच्या नियोजनात मोठा बदल…

ऑक्टोबर 16, 2025
vasubaras 1
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष लेख – आज वसुबारस (गोवत्स द्वादशी)… असे आहे त्याचे महत्व…

ऑक्टोबर 16, 2025
MOBILE
मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी खुषखबर… हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…

ऑक्टोबर 15, 2025
Rural Hospital PHC 1
महत्त्वाच्या बातम्या

अजूनही कुटुंब जिवंत आहे… लहान भावाने वाचवले मोठ्या भावाचे प्राण…

ऑक्टोबर 15, 2025
IMG 20251015 WA0053
महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कामांचा शुभारंभ… या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…

ऑक्टोबर 15, 2025
Next Post
jail1

जीममधून चोरी करणा-या चोरांना २४ तासात पोलिसांनी केले गजाआड…१ लाख ६३ हजाराचा मुद्देमालही केला हस्तगत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011