शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

७५ हजार नागपूरकरांची निःशुल्क नेत्र तपासणी! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चष्मे वाटप

by India Darpan
जानेवारी 9, 2024 | 7:05 pm
in राज्य
0
Untitled 69

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा सुरू असलेल्या अभियानांतर्गत अवघ्या काही महिन्यांमध्ये ७५ हजाराहून अधिक नागपूरकरांची निःशुल्क नेत्रतपासणी करण्यात आली. आज (मंगळवार, दि. ९ जानेवारी) नंदनवन येथे आयोजित शिबिरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ७५ हजार नेत्र तपासण्या पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. संस्थेने नेत्र, दंत, कर्ण तपासणी अभियानांतर्गत १ लाखांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा नागपूरकरांसाठी २७ मेपासून नेत्र तपासणी अभियान सुरू करण्यात आले. आतापर्यंत संपूर्ण नागपूर शहरात ५०३ नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याच मालिकेत आज (मंगळवार) आज संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त नंदनवन येथील संत जगनाडे महाराज चौक येथे आयोजित आरोग्य शिबिरात ७५ हजार नेत्र तपासण्या पूर्ण झाल्या. या शिबिराला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि आमदार कृष्णा खोपडे यांनी भेट दिली. यावेळी मा. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. नागपुरातील नागरिकांसाठी २७ मे रोजी नेत्र सेवा संकल्प सुरू करण्यात आल्यानंतर ५०३ शिबिरांमध्ये एकूण ७५ हजार ६३३ लोकांची निःशुल्क नेत्रतपासणी करण्यात आली असून यातील सात हजारांहून अधिक लोकांना अत्यल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. यासोबतच २ हजार ३०० हून अधिक रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिबीर संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे, डॉ. गिरीश चरडे, विलास सपकाळ, डॉ. अजय सारंगपुरे, डॉ. संजय लहाने, डॉ. अवंतिका वाडेकर, डॉ. समीक्षा आदी मंडळी कार्यरत आहेत.

कर्ण व कर्करोग तपासणीलाही प्रतिसाद
संस्थेद्वारे ३८६७ रुग्णांची कर्ण तपासणी करुन १५६ रुग्णांना केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते माफक दरात डिजिटल कर्णयंत्र देण्यात आले. तसेच ३४५६ नागपूरकरांची निःशुल्क दंत तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच ३० डिसेंबर २०२३ पासून नागपूरकरांसाठी निःशुल्क कर्करोग तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण नागपुरात शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्यालाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मिळणार रस्ता सुरक्षाचे धडे… प्रशिक्षणाचा झाला शुभारंभ

Next Post

बांबूंपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला राज्यपालांची भेट…

Next Post
unnamed 2024 01 09T191930.454 e1704808281232

बांबूंपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला राज्यपालांची भेट…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011