इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एमएसएल ड्राईव्हलाईन लि. चे एच.आर. प्रमुख हेमंत राख यांच्या पुढाकाराने कंपनीतील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत आवश्यक अशा रस्ता सुरक्षा प्रशिक्षणाचा ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे ८ जानेवारी रोजी शुभारंभ झाला. या प्रशिक्षणाची रोज एक बॅच घेतली जाणार आहे.
सुरक्षित गाडी चालविणे ही काळाची गरज आहे. या प्रशिक्षणात चालकाची जबाबदारी वेगवेगळ्या रस्त्यांबाबत मार्गदर्शक खुणा, ओव्हरटेकिंग, ओव्हरस्पीडिंग, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल्स व अपघातांची कारणे याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. सदर प्रशिक्षण हे दोन तासांचे असून त्यात कंपनीचे सुमारे ८०० कर्मचारी आपला सहभाग नोंदविणार आहेत. दोन तासांच्या या प्रशिक्षणामध्ये रहादारीचे नियम, वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, रस्त्यावरील पथदर्शक चिन्हे, सिग्नल चे पालन व सुरक्षित वाहन चालविणे तसेच अपघात झाल्यानंतर वाहन चालकाचे कर्तव्य ई बद्दलची समग्र माहिती दिली जाते. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी व सर्व प्रकारच्या वाहन चालकांसाठी हे प्रशिक्षण गरजेचे आहे. हे प्रशिक्षण सर्वांसाठी मोफत आहे.
नाशिककरांमध्ये रस्ता सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणे हे नाशिक फर्स्ट चे प्रमुख उद्दिष्ट आहे. रस्ता सुरक्षेच्या कंपन्यांच्या सहभागाची सुरुवात एमएसएल ड्राईव्हलाईन पासून झाली आहे. टप्प्याटप्प्याने इतरही कंपन्यांचे प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे नाशिक फर्स्ट च्या वतीने सांगण्यात आले.